तेल्हारा(प्रतिनिधी)- आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रशासनाच्या पंचायत राज विभागामार्फत 11 एप्रिल 2022 ला मोठ्या थाटात कार्यक्रम आयोजित केला आहे
.या कार्यक्रमासाठी देशभराच्या विविध राज्यातून स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती,सरपंच यांना बोलविण्यात आले आहे या अनुषंगाने अकोला जिल्यातील 4 प्रतिनिधी यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
असून त्या मध्ये अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई बापुराव भोजने, शिरला जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई महादेवराव इंगळे,अकोला पंचायत समिती सदस्य आनंद संपतराव डोंगरे,तर तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द चे युवा सरपंच प्रशांत मेहेंगे यांची निवड झाली.
त्यामुळे तेल्हारा तालुक्यासाठी ही बाब आनंदाची असून या निवडीचे श्रेय ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने तर तेल्हारा पंचायत समिती बीडीओ भरत चव्हाण यांना देत आहेत.