अकोला-: दिनांक ०७/०४/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. हिवरखेड हद्दीतील ग्राम झरी येथील रहिवासी शेख रईस रा. मुरादीया मस्जीदजवळ, झरी नाका, ग्राम झरी, ता. तेल्हारा, जि. अकोला हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने त्याचे जवळ अवैधरीत्या देशी कट्टा / अग्निशस्त्र व धारधार शस्त्रे बाळगुन आहे. वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री संतोष महल्ले यांनी पोउपनि सागर हटवार यांचे पथकास कारवाई बाबत आदेशित केल्याने स्थागुशा पथकाने मोहम्मद रईस शेख इकामोद्दीन वय २८ वर्ष, रा. झरी नाका, ता. तेल्हारा, जि. अकोला यास ताब्यात घेवून त्याचे राहते घराची झडती घेतली असता, खालीलप्रमाणे अग्निशस्त्र व धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आले.
१. एक लोखंडी देशी बनावटीचा कट्टा/ अग्निशस्त्र मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतुस एकुण किं. अं. २५,५००/-रु
२. एक लोखंडी धारदार तलवार, कि. अं. १०००/-रु
३. दोन भाले, ज्यास बांबु आणि लोखंडी भाल्याचे पाते असलेले, एकुण किं. अं. १०००/-रू, ४. एक स्टिलची कु-हाड, किं. अं. १०००/- रु
नमुद इसम याने कोणतातरी शरीराविरूध्दचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने सदर अग्नीशस्त्र व इतर धारदार शस्त्र जवळ बाळगल्याबाबत खात्री पटल्याने उपरोक्तप्रमाणे एकुण २८,५००/- रु चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन पो स्टे हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो स्टे हिवरखेड करीत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. श्रीमती मोनिका राउत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री संतोष महल्ले यांचे आदेशाने पोउपनि. सागर हटवार, नापोकॉ. अब्दुल माजीद, संदिप तवाडे, भास्कर धोत्रे, पोकॉ संतोष दाभाडे, चालक पोकॉ अक्षय बोबडे, नफिस शेख यांचे पथकाने केली आहे.