तेल्हारा: महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानव्ये तेल्हारा नगरपरिषदतर्फे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी/संरक्षण दलातील पदक धारक तसेच अविवाहित शाहिद सैनिकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्यात असलेल्या कोणत्याही एका मालमत्तेमध्ये एकत्रीत मालमत्ता करात सूट देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.परंतु तेल्हारा नगरपरिषद अंतर्गत मागील 4 वर्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.
परंतु या आर्थिक वर्षात कर निरीक्षक मयुरी जोशी तसेच तत्कालीन मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी सदर शासन निर्णयानव्ये माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी,अविवाहित शाहिद सैनिक,संरक्षण दलातील पदक धारक यांना एकत्रित मालमत्ता करात सूट देणेकरिता नगरपरिषद कार्यालयात अर्ज मागविण्यात आले होते.त्यानुसार एकूण 49 अर्ज नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झाले व छाननी नंतर पात्र लाभार्थी 49 माजी सैनिक मालमत्ता धारक यांना तेल्हारा नगरपरिषदतर्फे एकत्रीत मालमत्ता करात सूट देण्यात आली.एकत्रित मालमत्ता करात एकूण 49419 रु ची सूट देण्यात आली.सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी कर निरीक्षक मयुरी जोशी व मुख्याधिकारी राजेश गुरव यांनी केली.