अकोला दि.5: जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे होणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले.
रोजगार मेळाव्यात कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र वाडेगांव, प्रज्ञा सोशल वेलफेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी अकोला, गेम्बो मार्क ट्रेड लिंक प्रा.लि. अकोला या कंपनीचे एचआर प्रतिनिधीकडून सर्वसाधारणपणे दहावी व बारावी, पदवी, पदवीधर, पदविका या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांची 57 रिक्त पदाकरीता निवड करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणीक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.