तेल्हारा- स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हाराचे राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबिराचे आयोजन दत्तक ग्राम हिंगणी बुद्रुक येथे करण्यात आले. या श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन दि. 31 मार्च 2022 रोजी संपन्न झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सुरेशदादा खोटरे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती तेल्हारा) हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. केशवरावजी मेतकर (कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. शोएब अली मिर साहेब (आजीवन सदस्य) मा. दादासाहेब पाथ्रीकर (आजीवन सदस्य), आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याशिवाय सविताताई मांडवकर (सरपंच), सौ. प्रभावती नाराजे (पोलीस पाटील) मा. हरिदासजी वाघ सरपंच हिंगणी (खुर्द) मा. कोरडे सर (मुख्याध्यापक) मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी वैभव भोंडे यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. व्ही. लोणकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील महिला कार्यक्रम अधिकारी प्रा सुषमा फरसोले, प्रा एम पी चोपडे, प्रा एम एम कवरके, डॉ धीरज नजान, प्रा झामरे, प्रा वरघट, प्रा चक्रे, प्रा मिसाळ, प्रा मेटांगे, प्रा बोकारे, प्रा विजय खुमकर, श्री हरिभाऊ तालोट, अमोल गेबड आदी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री मंगेश देवतळे सचिन ढोले अभिजीत लोखंडे यांनी अथक परिश्रम केले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.