तेल्हारा- केंद्र शासनाच्या वीज उद्योग खाजगीकरण धोरण आणि महाराष्ट्र ऊर्जा उद्योग मधील 16 शहर खाजगीकरण करण्याकरीत राज्य सरकार च्या कामगार विरोधी धोरण विरोधातदि 28,29 मार्चला अकोट विभाग मधील तेल्हारा उपविभाग मध्ये वीज उद्योग मधील एकूण 39 संघटना यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात वीज कर्मचारी अधिकारी, कंत्राटी कामगार यांनी 28 मार्च पासून संपला सुरुवात केली आहे ,तेल्हारा महावितरण कार्यलाय समोर आज झालेल्या द्वारसभेला वीज कामगार अधिकारी, कर्मचारी संघर्ष समिती व कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन राज्य शासनाच्या वीज कामगार विरोधी धोरनाचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या यावेळी एस इ ए चे इंजि रावडे साहेब, पांचभाई साहेब, वर्कर्स फेडरेशन चे कॉ अफसर शाह , कॉ पल्लवी राऊत यांनी सभेला मार्गदर्शन केले ,द्वारसभेला कॉ निलेश होमपरखे, कॉ मनीष गिर्हे, कॉ गणेश उज्जैनकर,कॉ विठ्ठल शेळके, कॉ संजय राहठे, कॉ संजय माकोडे, कॉ शाम फोकमारे, कॉ अतुल काळे, कॉ कमलेश घासे, कॉ अमोल अढाऊ,कॉ उमेश जावकर, कॉ जयस्वाल, कॉ निलेश मगर, कॉ योगेश राऊत, कॉ बोडखे मॅडम, कॉ वाकोडे मॅडम, कॉ शबाना कुरेशी मॅडम, कॉ निखिल मिसाळ, कॉ किशोर मालगे सहित वीज कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते , संपवर तोडगा निघेपर्यंत संप सुरू असल्याचे वीज कामगार नेते यांच्या वतीने सांगण्यात आले आहे