अकोट: अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोट बार असोसिएशनचे सदस्य अॅड. अब्दुल जुनैद अब्दुल मुफीद यांना मारपीट करण्याची घटना निंदणीय व आक्षेपार्ह असून, मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही होईस्तोवर न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय अकोट बार असोसिएशनच्या सदस्यांनी घेतल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.
पोलीस स्टेशन अकोट शहर येथे २४ मार्च रोजी एका प्रकरणासंदर्भात अकोट बार असोसिएशनचे सदस्य अब्दुल जुनैद अब्दुल मुफीद हे पक्षकारासोबत गेले होते. याठिकाणी त्यांच्या सोबत एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तणूक व शिवीगाळ व मारपीट केल्याची माहिती मिळाल्यानंतर इतर वकील पोलीस स्टेशनला पोहोचले. घटनेच्या वेळच्या सीसी फुटेज दाखविण्याची मागणी केली असता त्यांनी दाखविण्यास नकार दिला. पोलिसांनी उलटपक्षी अॅड. अब्दुल जुनैद आले.
अब्दुल मुफीद यांच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे सांगून कार्यवाही करण्याची धमकी दिली असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्वरित ही सीसी फुटेज संरक्षित करण्यात यावी, पोलीस त्या कर्मचाऱ्याविरुद्ध जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत अकोट बार असोसिएशनचे सर्व सदस्य न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील, असा ठराव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याचे ठरावात नमूद करण्यात आला.