• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

यवतमाळ : प्राध्यापकाकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण खून

Our Media by Our Media
March 15, 2022
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
173 2
0
murder crime
26
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यवतमाळ: चारित्र्यावर संशय घेत व्यसनी प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून तिचा निर्घृण खून (murder) केला. ही खळबळजनक घटना आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये रविवारी दुपारी घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. तर विमल मारोती आरके (वय ३०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी विमलची आई जयवंतीबाई माधवराव मसराम (रा. कुऱ्हा) यांनी आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये राहत असलेल्या मारोती आरके याची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मारोती याला लोणी येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. याच दरम्यान, त्याचा कुऱ्हा येथील विमल हिच्यासोबत विवाह झाला. त्यांचा संसार चांगला चालला होता. त्यांना समर्थ (वय ८) आणि दत्त (वय ४) अशी दोन मुलेही झाली. हसत्या खेळत्या संसाराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक ? मारोती याला दारूचे व्यसन लागले. तो कायम दारूच्या नशेत राहू लागला. यातून तो पत्नी विमल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यातून त्यांच्यामध्ये सतत खटके उडू लागले.

आपण महाविद्यालयामध्ये गेल्यावर आपली पत्नी दुसऱ्यासोबत बाहेर फिरते, असा संशय त्याच्या डोक्यात घर करून गेला. यातूनच त्यांने रविवारी (दि.१३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन मारोतीने विमलच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार (murder) केले. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या विमलला आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव वाढल्याने विमलला तत्काळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री २.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आर्णीचे एपीआय किशोर खंदार, ठाणेदार पितांबर जाधव, योगेश सुंकलवार, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, अमित झेंडेकर यांनी घटनास्थळी येऊन मारोती आरके याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: Crimemahrashtraprofessoryavatmal
Previous Post

अकोल्यातील उड्डानपुलाखाली होणार ‘पे अॅन्ड पार्किंगची सुविधा

Next Post

हिजाब प्रकरण : “हिजाब हे केवळ परिधान करण्याचं कापड नाही”

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Hiab

हिजाब प्रकरण : "हिजाब हे केवळ परिधान करण्याचं कापड नाही"

जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.