अकोला : शहरातील उड्डाणपुलाखाली आता पे ॲण्ड, पार्कीगची सुविधा वाहनधारकांसाठी करण्यात येणार आहे. शहरात जेल चौक ते अग्रसेन चौक पर्यंत उडानपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उडानपुल पोल क्र.१ ते पोल क. ३४ पर्यंत पॲन्ड पार्क करीता जागा निश्चित करणे करीता शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तसेच महानगरपालीका अकोला यांचे संयुक्त विद्यमाने टीम तयार करून जागेची पाहणी करण्यात आली.
अजय गुजर कार्यकारी अभियंता महानगरपालीका, विलास पाटील पोलीस निरिक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला, वाडेकर महानगर पालीका अकोला यांची टीम यांनी संबंधीत जागेची पाहणी करून पे अॅन्ड पार्क ची जागा निश्चित करण्यात आली. तसेच ऑटो स्टॅन्ड व पब्लीक पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे.











