अकोला-: तालुक्यातील बेलोरा येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात सहा मुलं व चार मुली, नातवंडं सह मोठा आप्तपरिवार आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री असून गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचा घरीच उपचार सुरू होते. आज दुपारी १२.४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्राम बेलुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.