अकोला,दि. 11 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा व तालुक्यास्तरावरील ६३ ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमाला बुधवार दि.९ पासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या प्रचार कार्यासाठी निवड केलेल्या साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहु. मंडळाचे शाहीर विशाल राकोंडे यांनी खास वऱ्हाडी भाषेत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहचविली. सोबतच लोकनाट्य, पथनाट्य व वासूदेव, गोंधळी या पारंपारिक कलावंतांच्या भूमिकेतून ग्रामस्थांना मनोरंजक पद्धतीने योजनाची माहिती करुन दिली. कार्ला ग्रामस्थांचा कलापथक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाचे कलावंत विशाल राखोंडे व त्यांच्या सहकलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन पद्धतीने दिली. यामध्ये शिवभोजन योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकूल, जलजीवन मिशन, आवास योजना, आरोग्यविषयक माहिती व स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यासह अन्य योजना व उपक्रमांचा समावेश होता.
कार्यक्रमाला पातूर तालुक्यातील कारला येथील ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती होती. उपस्थित नागरिकांपैकी मोतीराम उत्तम करवले, सौ. राजकन्या आवटे, तेजराव वाकोडे व सागर धनराज पदमने या ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की, सादर केलेल्या कार्यक्रमामुळे शासनाच्या विविध योजनाची माहिती झाली. शासनाच्या या योजनांचा आम्ही लाभ घेवू. तसेच या योजनांबाबत आम्ही इतरांनाही सांगू.
या कार्यक्रमास कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाबाई राठोड, उपसरपंच वामन सरोदे, ग्रामसेवक पी.पी. चव्हाण, गंगा देवी संस्थाचे संचालक मोतीराम करवते, माजी सरपंच सुधाकर वावगे तसेच ग्रामस्थ मोह्या संख्येने उपस्थित होते.