अकोला,दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयमार्फत जिल्हा व तालुक्यास्तरावरील महत्वाच्या ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. शासनाच्या गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती जिल्हास्तरावर निवड केलेल्या शासनमान्य यादीवरील संस्थांमधून निवडण्यात आलेल्या कलापथक संस्थामार्फत लोकनाट्य, पथनाट्य व भारुड या लोकप्रकारांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्याकरीता शासन मान्य यादीवरील संस्थांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या समाज विकास बहुउद्देशीय संस्था भौरद अकोला, साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ कान्होबा चौक पातूर व सरस कला क्रीडा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, डाबकी रोड पो.भौरद अकोला यांच्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांची माहिती मनोरंजक पद्धतीने प्रसारित केली जाईल. शहरी व ग्रामीण भागातील महत्वाच्या 63 ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.