तेल्हारा: शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाचखोरीने ग्रासले असून लाच घेतल्या शिवाय अनेक महाभाग आपले कर्तव्य पार पाडत नाहीत असाच प्रकार आज घडला असून कृषी सेवक याने मळणी यंत्राचा सबसिडीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता कृषी सेवक त्यांच्या जाळ्यात अडकला.
तेल्हारा तालुक्यातील ग्राम अकोली रुपराव येथे कृषी सेवक म्हणून कर्तव्यावर असलेला प्रदीप खुलास राठोड २७ याने तक्रारदारास महाडीपीटी या योजने अंतर्गत मळणी यंत्र वर ५० टक्के सबसिडी मिळण्याकरता मळणी यंत्राची पाहणी करून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याकरता राठोड यांनी तक्रारदार यांना रुपये १००००/- ची मागणी केली. तडजोडी अंती लाचेची रक्कम रुपये ५०००/-ठरली होती. पडताळणी दरम्यान यातील कृषी सेवक यांनी पडताळणी दरम्यान परत येत असताना राठोड यांना तक्रारदार व सोबत असलेले पंच यांचे बद्दल संशय आला होता.
मागणी केली बाबत पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले असुन सापळा कारवाई अजमावण्यास आली असता तक्रारदाराबाबत संशय आल्याने लाच घेण्यास टाळाटाळ केली. आज रोजी गैर अर्जदार आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले, असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. अधीक्षक उत्तम नामवाडे, ला.प्र.वि.अकोला, पो. अंमलदार अन्वर खान, संतोष दहिहंडे, दिगंबर जाधव, अभय बावस्कर ला. प्र. वि. अकोला यांनी केली.