तेल्हारा : तालुक्यातील उकळी बाजार येथील १५ वर्षीय मुलगा बैलाला धुण्यासाठी नाल्यात गेले असता खड्ड्यात पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू पावला तर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या वडिलांचा ही बुडून अंत झाल्याची घटना आज ६ मार्चला रविवार रोजी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील उघडी बाजार येथील रहिवासी गजानन मोहनलाल शर्मा(४५) यांचा १५वर्षीय मुलगा कृष्णा गजानन शर्मा हा बैल धुण्यासाठी कॅनॉल च्या जवळ असणाऱ्या नाल्यात गेले असता पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील गजानन मोहनलाल शर्मा (४५) यांनी पाण्यात उडी घेतली परंतु दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे व पाणी डोक्याच्या वर असल्याकारणाने पिता-पुत्राचा पाण्यात बुडून करून अंत झाला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक धामोडे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करीता मृतदेहाला त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले सदर घटनेमुळे उकळी बाजार सह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.