तेल्हारा: शहरातील जय भवानी चौकात राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शहरातील जय भवानी चौक येथील रहिवासी असलेला सचिन (मुन्ना) भास्कर खडसान २७ वर्ष याने आज दुपारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतक हा बांधकाम क्षेत्रात मजुरीने कामाला जात असे घरची हलाखीची परिस्थिती त्यात गेल्या महिन्यात मोठ्या भावाचा घर बांधकाच्या ठिकाणी उंचीवरून पडून पाठीचा कणा गमावावा लागला सद्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वडील कपडे प्रेस करण्याचे काम करतात. तर आई शेतमजुरी करून संसाराचा गाडा चालवतात अशात मोठ्या मुलाचे असे झाले, आणि आज लहान मुलाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली त्यामुळे मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सचिन हा मनमिळाऊ होतकरू असा होता त्यामुळे सचिनने आत्महत्या का केली याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
मात्र आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतकाच्या मागे आई वडील भाऊ असा परिवार आहे.तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ राजू इंगळे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे पाठवण्यात आला आहे.