अकोला-: सेवाश्री बहुद्देशीय संस्था, जिल्हा परिषद नगर, खडकी, बु. अकोला, निर्भय बनो जनआंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावाच्या बाजूला पारधी बेडावर चालत असलेल्या पारधी समाजाच्या मुलांसाठी, झेप संस्थेच्यावतीने अक्षरभूमी शाळा दोन युवकांनी चालू केली आहे .त्यामध्ये साहेबराव राठोड, मंगेश पवार हे दोन्ही युवक मेहनत घेऊन या लहान मुलांना शिकवण्याचे काम सातत्याने तीन वर्षापासून करीत आहेत.
ज्या ठिकाणी शासकीय शिक्षण पोहोचले नाही ,अशा या दुर्गम भागात या युवकांनी त्या लहान मुलांना शिक्षण देण्याचे काम सातत्याने चालू ठेवले आहे. त्यांना सहकार्य व्हावे व लाहान मुले शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी यावे ,त्यांना शिक्षणाची व खेळाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून अकोला खडकी येथील सेवाश्री बहुउद्देशीय संस्था, निर्भयबनो जन आंदोलनाच्या वतीने या मुलांसाठी या शाळेला क्रीडा साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन हरणे यांनी त्यांना हे क्रीडा साहित्य मोफत देऊन मुलांना चांगल्या प्रकारे क्रीडा विषयी आवड निर्माण करण्यासाठी या दोन्ही शिक्षकांना मार्गदर्शन केले. क्रीडा साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.