तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य विभागाने यशस्वीपणे पोलीस मोहीम राबविणे सुरू आहे. तालुक्या सह तेल्हारा शहरांत विविध भागात पोलिओ केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येकी 1000 हजार लोकसंख्या असलेल्या गावातील 100 ते 200 बालक संख्या मागे प्रत्येकी एक बूथ केंद्र उपलब्ध केली आहेत. त्यातून आता पर्यंत 0 ते 5 वर्षातील 14187 उद्दिष्ट पैकी 27 फ्रेब्रु पर्यंत 12248 (87.34%) बालकास पोलिओ लसीकरण करण्यात आले. उर्वरित बालकास पुढील 3 दिवसा मध्ये आरोग्य कर्मचारी आशा सेविका व अंगणवाडी सेविका हे घरो घरी जाऊन पोलिओ लसीकरण करतील. त्यामुळे नागरिकांनी आपन राहत असलेल्या ठिकाणी किंवा बूथ असेल तिथे आपल्या लहान बालकाना पोलिओ डोस देऊन आपली लसीकरण करून घ्यावी व शासनाच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आव्हाहन तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण चव्हाण यांनी जनतेस केले आहे.
तालुक्यातील एकूण गावे 96
एकूण तालुक्यातील बूथ संख्या 136
तालुक्यातील प्लस पोलिओ मोहिमेसाठी सहभागी अधिकारी संख्या
वैद्यकीय अधिकारी 12
आयुष वैद्यकीय अधिकारी 6
सामुदीय आरोग्य अधिकारी 12
आरोग्य कर्मचारी 52
आशासेवीका 170
राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम 2022 अंतर्गत तेल्हारा तालुक्यात 0 ते 5 वर्षातील 14187 उद्दिष्ट आहे, त्यातील 27 फेब्रुवारी पर्यंत 12248 (87.34%) बालकास पोलिओ लसीकरण करण्यात आले. उर्वरित बालकास पुढील 3 दिवसा मध्ये आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका हे घरो घरी जाऊन पोलिओ लसीकरण करतील. तरी सर्व जागृत जनतेने त्याच्या बालकास पोलिओ लसीकरण करून घ्यावे व आरोग्य विभागास सहकार्य करावे.
डॉ. प्रविण चव्हाण
तालुका आरोग्य अधिकारी तेल्हारा