• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

Our Media by Our Media
February 28, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
83 1
0
Dr. Nitin Raut
13
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८:  प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्याने निर्माण करण्यात यावेत, त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावे,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आज डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस महावितरणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.टी. राऊत, महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खराटे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

याबैठकीत अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आढावा निर्मिती, पारेषण व वितरण या अनुषंगाने घेण्यात आला.

डॉ. राऊत यांनी उपस्थितांना निर्देश दिले की, वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरण शास्त्र तज्ज्ञाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा. वीज निर्मिती दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर याबाबींचा समावेश त्यात करून जैव विविधता व सौर ऊर्जा असे मॉडेल विकसित करावे, सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाची उपलब्धता ठेवण्याबाबत दक्ष रहावे, असे त्यांनी सांगितले.

महावितरणने थकबाकी वसुलीसाठी गावोगावी जाऊन शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना विविध योजनांचे स्वरूप समजावून सांगावे, यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले.

महापारेषणने उन्हाळ्याच्या काळात ज्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, अशा तांत्रिक कारणांची माहिती अद्ययावत करून ठेवावी,जेणेकरून आपत्तीच्या काळात उपाययोजना करता येणे शक्य होईल. त्यानंतर त्यांनी रोहित्र क्षमता वाढ,उपकेंद्र उभारणी,रीऍक्टर उभारणी आदी बाबींचाही आढावा घेतला.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा

राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठीही त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

योजनांची व्याप्ती वाढविण्याचे सूतोवाच

अनुसूचित जाती जमातीच्या ग्राहकांसाठी असणारी डॉ.आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यात येऊन या योजनेचा लाभ ओबीसी घटकांना मिळावा म्हणून त्यांचाही समावेश या योजनेत करण्यात येईल, तसेच वसंतराव नाईक कृषी वीज जोडणी योजनेलाही मुदतवाढ देणार असल्याचे सूतोवाच डॉ. राऊत यांनी केले.

Tags: Dr. Nitin Raut
Previous Post

Chechen force : झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

Next Post

कळंबा (कसुरा), मुंडगाव, वडाळी (देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
KALAMBA KASURA PROGRAMM 3

कळंबा (कसुरा), मुंडगाव, वडाळी (देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण

क्रीडा दिन

क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.