दानापुर (सुनिलकुमार धुरडे): तेल्हारा तालुक्यातील दानापूर शेतशिवरात दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास सौंदळा रस्त्यालगत असलेल्या गोपाल येऊल यांच्या शेतात अचानक बिबट्या चे दर्शन झाले.
सविस्तर माहिती अशी की आज सकाळी दि 28 फेब्रुवारी ला गोपाल येऊल यांच्या शेतात टमाटर बांधणीचे काम सुरू असतांना अचानक टमाटर च्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्याने मजुरांची चांगलीच दमछाक झाली. व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
या सर्व घटनाक्रम वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून प्रशांत विखे यांच्या शेतातून बिबट्या च्या पायाच्या ठसे घेत पंचनामा केला शेतकऱ्यांना व लोकांना सतर्क राहा सोबतच घाबरून न जाता आढळून आल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवा अशी माहिती दिली.
यावेळी सी, एम, तायडे वनरक्षक बोर्डी, वनरक्षक श्रीनाथ , सरपंच पती धम्मपाल वाकोडे , योगेश येऊल ,गोपाल विखे नंदू नागपुरे ,गोपाल विरघट रमेश घायल ,महादेव बोरसे यावेळी उपस्थित होते.
तेल्हारा तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर
सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यात वन्य प्राण्यांचा चांगलाच वावर पाहाव्यास मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी रायखेड, कोठा परिसरातवाघाने बैल ठार केला होता, तर बेलखेड शिकारात सुद्धा गाईची शिकार केली होती सोबतच या तालुक्यात हरीण, काळवीट जंगली डुक्कर, अस्वल यांचा वावर मोठया प्रमाणावर पाहावयास मिळतो.