अकोला, दि.25 रशिया व युक्रेन या देशामध्ये तणावपुर्ण परीस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील नागरीक अडकले असल्यास तात्काळ नागरीकांचे नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यानुसार प्रवाशी, विद्यार्थी, पर्यटक यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल.
जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 0724-2424444 वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी केले.