अकोला, दि. २३: फटाके फोडणाऱ्या सहा बुलेट आली. चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली आहे. तसेच त्यांची वाहने जप्त केली आहेत.
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील शहर वाहतुक नियंत्रण शाखा ने २२ फेब्रुवारी रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर कार्यवाही करण्याकरीता विषेश :
सायलेन्सर फटाके
फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणे. या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे. करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हॉर्न लावण्यात आलेले आहे. अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते. की अशा वाहनांचे सायलेन्सर व हॉर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.