अकोला दि.२३:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, मुर्तिजापूर येथे सोमवार दि. ७ रोजीचे शिबीर शासकीय सुट्टी घोषीत केल्यामुळे रद्द झाले होते. आता नागरिकांच्या सोईकरीता सोमवार दि. २८ रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचा तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय विश्रामगृह, मुर्तिजापूर येथे उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.