• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविडमुळे मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान; मनपा आरोग्य विभागाच्या पडताळणीत ७० जणांचे अर्ज पात्र

Our Media by Our Media
February 23, 2022
in Featured, अकोला, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
84 0
0
Municipal Health Department
24
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२३:  कोविड १९ आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. यासाठी अकोला मनपा क्षेत्रातून ऑनलाईन वेब पोर्टलवर १५५ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. मनपाच्या तक्रारनिवारण समितीने आठवडाभरात या अर्जांची पडताळणी करुन अर्जदारांसमक्ष अपिल सुनावणी घेऊन ७० जणांचे अर्ज पात्र ठरविल्याची नोंद ऑनलाईन करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या पत्रकानुसार, कोविड मुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज करता यावा यासाठी ऑनलाईन पोर्टल (mahacovid19relief.in व https://epassmsdma.mahit.org/login.htm ) विकसित केले होते. या पोर्टलवर अर्जदारांमार्फत माहिती भरण्यात आली. तथापि, अकोला मनपा क्षेत्रातील १५५ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. ते सर्व जण अपिलात गेले होते. शासनाच्या निर्देशानुसार, या अपिलांवर मनपा स्तरावर तक्रार निवार समिती गठीत करुन सुनावणी घेण्यात आली व अर्जदारांच्या त्रुट्या दुरुस्त करुन घेण्यात आल्या. ही सुनावणी दि.१५ ते २३ या दरम्यान घेण्यात आली. या सुनावणीत १३० जणांना पाचारण करण्यात आले. त्यापैकी ८५ जण उपस्थित होते. या सगळ्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी करुन सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सर्व कागदपत्रे अर्जदारांसमोर ऑनलाईन पोर्टलवर अद्यावत करण्यात येऊन ते पात्र असल्याबाबत माहिती पाठविण्यात आली. त्यामुळे आता या ७० जणांना लाभ मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. अकोला मनपास्तरीय तक्रार निवारण समितीत अध्यक्ष डॉ. फारुख शेख, डॉ. प्रभाकर मुदगल, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मो. मुस्लेहुद्दीन शेख, डॉ. अजमल खान, शरद डोंगरे, निर्मला वानखडे यांचा समावेश असून त्यांनी ही पडताळणी केली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaCovidMunicipal Health Department
Previous Post

दहावी बारावीची परीक्षा , ऑफलाईन, परीक्षांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मुर्तिजापूर येथे सोमवारी (दि.२८) शिबीर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola news

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मुर्तिजापूर येथे सोमवारी (दि.२८) शिबीर

Akola police logo तेल्हारा

फटाके फोडणारे सहा बुलेट चालकाविरुद्ध कारवाई!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.