• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ पोलिसाचा गोळीबार

Our Media by Our Media
February 23, 2022
in गुन्हा, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
120 2
0
crime
18
SHARES
869
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणे : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी चोरट्यांना थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करीत कोयता ते फेकून मारले. यावेळी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वसंरक्षणात हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या मागे सोनिया अपार्टमेंट या ठिकाणी ही घटना घडली आहे.

कोयता फेकून मारले

मार्केट यार्ड पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुख्य नियंत्रण कक्षातून घरफोडी सुरू असल्याचा कॉल मिळाला होता. त्यानंतर मार्केट पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे पाहून चोरट्यांनी वरूनच दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोयता फेकून मारले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न

मार्केटयार्ड परिसरातील सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या पाठीमागे जावळकर कॉलनी आहे. या कॉलनी मध्ये पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरटे याठिकाणी असलेल्या पाच मजली इमारतीमध्ये शिरले. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवाज झाल्यामुळे शेजारचे नागरिक जागे झाले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी शेजारील फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी नियंत्रण कक्षाला घरफोडीची माहिती दिली.

सोसायटीत चोरटे घुसल्याची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल व रात्र गस्तीवर असलेले पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून चोरटे पळून गेले आणि जात असताना त्यांनी सुरक्षारक्षक आणि पोलिसांवर दगडफेक केली, तसेच घातक शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Tags: policepune crimeThieves attack police
Previous Post

तूर्त एस.टी.चे विलीनीकरण नाही?

Next Post

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Sant Gadge Baba And Sant Ravidas

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास व संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.