नवी दिल्ली: दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा (X, XII th Annual Examination) फिजिकल पध्दतीने घेतल्या जाऊ नयेत, अशा विनंती करणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.२३) सुनावणी होणार आहे. देशातील पंधरापेक्षा जास्त राज्यांची परीक्षा मंडळे, आयसीएससी तसेच सीबीएससी मंडळाकडून फिजिकल पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे, पण कोरोना संकटामुळे परीक्षा फिजिकल पध्दतीने घेऊ नयेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील याचिकांवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सुनावणी घेणार आहे. आगामी बोर्ड परीक्षेसाठी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे. गतवर्षी सीबीएसईसहित इतर मंडळे व राज्य मंडळांनी वैकल्पिक मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा निकाल दिला होता. याचिकेच्या प्रती सीबीएसई बोर्डाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.