• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वैद्यकीय उपकरणे उत्पादकांना उपकरणांची नोंदणी करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
February 17, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
medical device manufacturers
13
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१७:- रुग्णांच्या रोगनिदानासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांच्या उत्पादकांनी केंद्रशासनाच्या सुगम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून जिल्ह्यातील सर्व उत्पादकांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१७ पुर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती. सन २०१७ मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ पारीत केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळया उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे अ,ब,क,ड अशी वर्गवारी केली आहे. त्यात अ व ब या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि क व ड या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दिनांक ११.०२.२०२० रोजीच्या अधिसूचनेव्दारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या ‘सुगम पोर्टल’ www.cdscomdonline.gov.in या संगणक प्रणालीवर ऐच्छीक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी ही १८ महिन्यांच्या आत म्हणजे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करणे अपेक्षीत होते. त्यानंतर एक वर्षासाठी म्हणजे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याव्दारे उत्पादीत वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory) केले आहे.

तरी अकोला जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांना अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, अकोला व्दारे आवाहन करण्यात येते की, ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्याविरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी कळविले आहे.

Tags: Akolamedical device manufacturers
Previous Post

वीस वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावावर करीत होता दारू विक्रीचा व्यवसाय, अकोल्यातील राजु जयस्वालला सुप्रीम कोर्टाचा दणका ! ७ दिवसात पोलिसात शरणागत होण्याचे आदेश

Next Post

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडी तर्फे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Nationalist Congress Party

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडी तर्फे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

RBI Policy

RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० सहाय्यक पदांसाठी भरती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.