शेलुबाजार :- शेलुबाजार ते वाशिम रोडवरील सोयता फाट्या जवळ तुरीचे कुटार भरलेल्या MH37A9287 ट्रॅक्टरचा, आणी MH48P1445 प्रवासी मॅक्जीमो वाहनाचा, भिषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ७ जखमी झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे. ७ जखमींना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले यावेळी येथे पाठविण्यात आले आणी चार जखमींवर वाशिम येथे उपचार चालु आहेत. प्रवाशी वाहन आणी हे सावंगा (जहागीर) ता. जी. वाशिम येथील असल्याची माहिती आहे. वाशिम निवासी उप-जिल्हाधिकारी शैलेश हींगे सर यांच्या तात्काळ फोनवरून आदेशाने चार रुग्णवाहिका सह आरोग्य मदत यंत्रणा 30 मिनटात घटनास्थळी दाघल झाल्याने वेळीच मदत मिळाली. या अपघाताची माहिती मिळताच वाशिमचे आरडीसी शैलेश हींगे सर यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य यंत्रणासह सर्व यंत्रणांना सुचना देऊन वेळीच मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला हे विशेष.
अपघात स्थळी वाशिम पोलीस अधीक्षक साहेब तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यासह आरोग्य यंत्रणा आणी रुग्णवाहिका डाॅ. विजय काळबांडे सर (सी.एस.) वाशिम आणी डाॅ. सुहास कोरे सर (डी.एच.ओ.) वाशिम यांनी मदत केली. आणी मदतीसाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी तात्काळ आपली फस्टेड रेस्क्यु टीम अंकुश सदाफळे,महेश घणगाव, कोशोर तायडे, योगेश मुसळे, महेश साबळे,सह रुग्णवाहिका घेऊन मदतीसाठी घटनास्थळी रवाना केले, आणी वनोजा येथील रासेयो आपत्ती व्यवस्थापन टीम,रुग्णसेवा गृप शेलुबाजार घटनास्थळी लगेचच मदतीसाठी धाऊन आले. यासह उपस्थित नागरिकांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केले.