अमरावती : महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करीत असताना काही महिलांनी शाही फेकली. आयुक्तांवर अशाप्रकारे शाई फेकल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिजाऊ जयंतीच्या दिवशी ‘युवा स्वाभिमान’ने बसविला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसविल्याने प्रशासनाने तो काढला होता. शिवजयंतीला त्याचठिकाणी पुतळा बसविणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलावर असलेला सिमेंटचा ओटा काही दिवसांपूर्वी काढला. या प्रकरणावरूनच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांवर आज शाई फेकली.
आमदार राणा यांनीच बोलाविले होते आयुक्तांना
राजापेठ अंडर पासची पाहणी करण्याकरिता आमदार रवी राणा यांनी आयुक्त आष्टी यांना बोलावले होते. स्वतः बोलावत कार्यकर्त्यांच्या हातून अशाप्रकारे कृत्य केल्याने अधिकाऱ्यांनी अमरावतीत काम तरी कसे करणार, अशी चर्चा मनपा अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये हाेत आहे.