अकोला-: डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुलझारपुरा परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
गुलजार पुरावा परिसरात दारूच्या वादातून दोन इस्मा मध्ये वाद झाले या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एकाने चाकूने वार करून समोरच्या व्यक्तीला गंभीर जखमी केले. जखमीला रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.