तेल्हारा: रमाई आवास योजना प्रधानमंञी आवास योजना या दोन्हीही योजने अंतर्गत शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये जे अनुदान देण्यात येते. त्या अनुदामध्ये तफावत असुन ज्या प्रमाणे शहरी भागामध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी खर्च येतो. त्याही पेक्षा ग्रामीण भागातील घरांकरीता जास्त खर्च येतो. त्याचे कारण सिमेंट लोहा गिट्टी व ईतर साहीत्य शहराच्या ठिकाणी उपलध्द असते परंतु तेच साहीत्य ग्रामीण भागातील नागरीकांना शहरातुन आनावे लागते. त्याचा वाहतुक खर्च जास्त येतो.
तसेच ग्रामीण भागातील लाभार्थी हे सुध्दा स्लॕब टाकतात त्यामुळे ग्रामीण भागातील घरकुल धारकांच्या घरावर सुध्दा स्लॕब टाकण्यासाठी नियम करुन शहरी व ग्रामीण भागातील पाञ लाभार्थीयांणा मिळणारे अनुदान समसमान द्यावे तसेच रमाई आवास योजनेचे उदीष्ट ताबडतोब देण्यात यावे. जेणेकरुन पावसाळ्या अगोदर घराचे काम पुर्ण करता येईल. असा ठराव दि. २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत ईसापुर व दानापुरच्या ग्रामसभेत घेण्यात आला व तश्या प्रकारचे निवेदन सभापती व गटविकास अधिकारी यांचे मार्फत आणी ई मेलव्दारे मुख्यमंञी यांणा पाठविण्यात आले. असुन सदर निवेदनावर मिराताई बोदडे सरपंच, सपना वाकोडे सरपंच दानापुर, रुपेश राठी सरपंच वाडीअदमपुर, श्रीकृष्ण वैतकार सरपंच बाभुळगाव, सुनिता गव्हांदे सरपंच वाकोडी, उपसरपंच महादेवराव नागे संदिप गवई सदस्य जयश्रीताई खंडुजी घाटोळ सदस्य यांच्या सह्या आहेत.
ईसापुर चे सरपंच मिराताई बोदडे यांणी ग्रामसभेमध्ये केलेली मागणी रास्त असुन गोरगरीब नागरीकांच्या हिताची आहे. त्यांचे मागणीचा केंद्र आणी राज्य सरकारने विचार करुन मागणी मंजुर करावी.
अरविंद तिव्हाणे
प.स. सदस्य तेल्हारा
वंचित बहुजन आघाडी