• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जीएसटी लवादांची स्थापना केली जाण्याची शक्यता

Our Media by Our Media
January 31, 2022
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
81 1
0
G.S.T.
13
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:  वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीशी संबंधित वादांचा निपटारा करण्यासाठी देशात ठिकठिकाणी जीएसटी लवादांची स्थापना करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असून, याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करतेवेळी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जीएसटी करप्रणाली अंमलात येउन बरीच वर्षे झाली आहेत आणि करांशी संबंधित वादविवाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा स्थितीत करदात्यांना न्याय देण्यासाठी जीएसटी अपिलेट ट्रिब्युनल (जीएस-टॅट) स्थापन करण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे. करांशी संबंधित वाद निर्माण झाले तर सध्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो. न्यायालयांमध्ये आधीच प्रलंबित असलेल्या नियमित खटल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे करदात्यांना वारंवार कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात. याचमुळे लवाद स्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

जीएसटी खात्याने निश्चित केलेली रक्कमच भरली जावी, असा आग्रह नेहेमी या खात्यातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. खात्याने निश्चित केलेली रक्कम वादग्रस्त असली तरी ती भरण्यास सांगितले जाते. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापारी आणि उद्योगपतींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे जीएसटी अपिलेट ट्रिब्युनल्सची स्थापना करण्याचा विचार दीर्घ काळापासून जीएसटी परिषद करीत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधीच 2019 साली अशा प्रकारचे लवाद स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करतेवेळी अर्थमंत्र्यांकडून यासंदर्भात महत्वाची घोषणा होऊ शकते. लवाद स्थापन झाला तर त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल. लवादात अध्यक्षांशिवाय एक तांत्रिक सदस्य (केंद्र सरकार) व तांत्रिक सदस्य (राज्य सरकार) यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रीय खंडपीठाबरोबरच राज्य खंडपीठ आणि विभागनिहाय खंडपीठ अशी लवादाची रचना असू शकते, असेही समजते.

Tags: GST
Previous Post

जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत ग्रामिण रस्ते व इतर जिल्हा रस्ते विकास कामांबाबतचा निर्णय सर्वानुमते

Next Post

Murder : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून ; पाच संशयितांना बेड्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
murder crime

Murder : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून ; पाच संशयितांना बेड्या

nima arora

जिल्ह्यातील महाविद्यालये आजपासून (दि.१) सुरु करण्यास मान्यता; नियमावली जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.