दिनांक 26 जानेवारी रोजी तेल्हारा शहरात सैनिक संघटनेच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शंभर, दोनशे , चारशे आणि आठशे मीटर मुले मुली रनिंग स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. 26 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन तेल्हारा येथे ध्वजारोहण समारंभाकरीता सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते. त्यानंतर शहरातून शिस्तबद्ध रित्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम टॉवर चौक येथे शिवाजी महाराज पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. आणि तेथून संत तुकाराम चौक येथे हारार्पण करून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पोहचुन तिथे हारार्पण सोहळा पार पडला आणि नंतर सर्व सैनिक बांधव तहसील आवारात माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडून झालेल्या ध्वजारोहण समारंभाला उपस्थित झाले आणि राष्ट्रध्वजाला सलामी दिली नंतर भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभेदार जवकार साहेब हे होते.
मंचकावर विशेष करून ठाणेदार ज्ञानोबा फड साहेब आणि 1962, 1965 आणि 1971 च्या लढाईमध्ये सहभागी झालेले सैनिक श्री राजाभाऊ देशमुख हिवरखेड व श्री मोतीरामजी वानखडे सीरसोली उपस्थित होते. तसेच निवृत्त कॅप्टन सुनील डोभाळे साहेब, प्राध्यापक शांतीकुमार सावरकर मंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ माजी सैनिक श्री देशमुख व श्री वानखडे तसेच सध्या देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक वैभव भोपळे, शुभम इंगळे व अक्षय वालुईकार यांचा सत्कार घेण्यात आला. विशेष करून काश्मीरमध्ये सेवारत असलेले सीआरपीएफ जवान संतोष टाले ज्यांच्यावर उग्रवादंयानी हल्ला केला होता . आणी त्यातून स्वतःला सावरत आज सुद्धा सैन्यामध्ये कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या वीरपत्नी सौ अश्विनी संतोष टाले यांचा पण सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंना स्व. माजी सैनिक भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चषक प्रदान करण्यात आले व संघटनेच्या वतीने मेडल्स व रोख पारितोषिक देण्यात आले याप्रसंगी ठाणेदार ज्ञानोबा फड साहेब आणि सैनिक पत्नी सौ योगिता राम पाऊलझगडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर तर आभार प्रदर्शन माजी सैनिक दिनेश माकोडे यांनी केले. गीत गायन स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून विशाल जलमकार, सुनिता काकड मॅडम व श्री कुयटे महाराज यांनी काम पाहिले. कार्यक्रमाकरिता क्रीडा स्पर्धक, देशभक्त नागरिक, सैनिक पत्नी, विद्यार्थी व महिला वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाऊलझगडे तसेच माजी सैनिक वसंत रोठे साहेब, विलास टोलमारे साहेब, नानासाहेब इंगळे, रामदास लासुरकार साहेब, सुनील दातकर साहेब, रामेश्वर घंगाळ, बाळकृष्ण बोदडे साहेब, धनराज वानखडे साहेब, दुगाने साहेब, भास्कर मालोकार साहेब, मिलिंद बोदडे, जनार्दन दामोदर, सुमेध गायगोड, अरुण हिवराळे साहेब, गणेश गव्हाणे साहेब, गणेश गायगोड, श्रीकांत ताथोड, अरुण गोमासे आदी सैनिकांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी मुख्य प्रवेशद्वारावर कु. रोहिणी घंगाळ व कु. रोशनी किरणापुरे यांनी रांगोळी द्वारे रेखाटलेले सैनिक चित्र आकर्षणाचे केंद्र ठरले.