बोर्डी (देवानंद खिरकर):-बोर्डी येथे आज 26 जानेवारी निमित्त ग्राम पंचायत येथे सरपंच स्वातीताई चंदन,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करून झेंडा वंदन करण्यात आले,यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड, सरपंच स्वातीताई चंदन, ग्रा.पं.सदस्य मनोहर आतकड,लिलाबाई भगत, रमेश नेवारे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल ताडे,नंदलाल राय,रमेश पाटील खिरकर, राजेश खिरकर, चेतन आतकड, सचिव अनंत मोहोकार, तलाठी राजाभाऊ खामकर,गोपाल साटोटे, बूथ मामा, पत्रकार देवानंद खिरकर,आशा,आदींची उपस्थिती होती.
जी.प.म.शाळेमध्ये मुख्याध्यापक उमेश चोरे यांचे हस्ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून झेंडा वंदन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड,सरपंच स्वातीताई चंदन,तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल ताडे,रमेश पाटील खिरकर,शाळा समिती अध्यक्ष सुनील गेबड,पत्रकार सागर भालतीडक,मनीषा रजाने,लिलाबाई भगत,चेतन आतकड,राजेश खिरकर,रामदास अंभोरे,पवन ताडे,तलाठी राजाभाऊ खामकर,गोपाल चंदन,ग्रा.सदस्य कपिल रजाने,सचिन अंबडकार,अरुण भगत,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा,यांची उपस्थिती होती. नागास्वामी इंग्लिश स्कूल येथे मुख्याध्यापक सुरेश गायकवाड यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळी शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,सरपंच,जील्हा परिषद सदस्य, ग्रा.पं.सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन गोकुळ लटकुटे, दिलीप रंदे, सय्यद अनिस,सैनिक पवन ताडे, यांनी केले. उपस्थित सर्वांना संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. विद्यार्थीना लोकसंचालीत केंद्र अकोट कडुन मास्क व कापडी पिशवी वाटप करण्यात आले. व मुलांना बिस्कीट वाटण्यात आले.