• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मध्यान्न भोजनामुळे कामगारांना मिळेल दिलासा-पालकमंत्री बच्चू कडू

Our Media by Our Media
January 27, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
104 1
0
मध्यान्न भोजनामुळे कामगारांना मिळेल दिलासा-पालकमंत्री बच्चू कडू
20
SHARES
753
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.27: शासनाच्या कामगार विभागाने इमारत बांधकाम व अन्य कामगारांसाठी मध्यान्न भोजन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कामगारांना अल्पदरात पौष्टिक अन्न देऊन दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मध्यान्न भोजनाची योजना राबविली जात आहे. या योजनेद्वारे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन दुपारचे जेवण देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. या योजनेची सुरुवात आज जिल्ह्यात करण्यात आली. त्यासाठी म्हाडा वसाहत बांधकाम साईट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कामगारांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे गुल्हाणे यांची उपस्थिती होती. यावेळी गुल्हाणे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, जिल्ह्यात ७२ बांधकाम साईट्स तसेच जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या या योजनेशी संलग्नित करण्यात आल्या असून त्याचा लाभ जिल्ह्यातील तीन हजार ९०६ कामगारांना मिळेल. ही नोंदणी प्रक्रिया सुरु असून येत्या कालावधीत अधिक कामगार या योजनेचा तसेच मंडळाच्या अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले की, कामगारांनी श्रम करणे थांबवले तर सगळं जग थांबेल. कामगारांचे निर्मिती व श्रमाचे कौशल्याची जोड नसेल तर भांडवलदारांचे भांडवलही व्यर्थ ठरेल. कामगारांचे जीवनमान अधिक उंचावून समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेत भोजन देतांना संबंधितांना अन्नदानाची भावना ठेवावी. ही सेवा आहे हे ध्यानात ठेवावे. या योजनेद्वारे कामगारांना दिलासा मिळेल असा विश्वास पालकमंत्री कडू यांनी व्यक्त केला.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी स्वतः कामगारांना भोजन थाळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जया भारती यांनी केले.

Tags: Bachchu KaduMidday mealworkers
Previous Post

रामापूर येथील शेतमजुराच्या मुलाची नौदलात निवड

Next Post

पालकमंत्र्यांनी केले कलागुणसंपन्न बालिकांचे कौतूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
meeting

पालकमंत्र्यांनी केले कलागुणसंपन्न बालिकांचे कौतूक

बोर्डी येथे ठीकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा….! जी.प.सदस्य, सरपंच, मुख्याध्यापक यांच्याहस्ते झेंडावंदन…!

बोर्डी येथे ठीकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा....! जी.प.सदस्य, सरपंच, मुख्याध्यापक यांच्याहस्ते झेंडावंदन...!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.