तेल्हारा: तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली २५जानेवारीला झालेल्या आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी एक महिन्याच्या आत तेल्हारा तालुक्यातील आरसूळ ते तेल्हारा रस्ता चालन्या योग्य करू अशी ग्वाही दिली .
तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अक्षरशा वाट लागली असून रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या सर्व बाबतीत तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावे याकरिता तेल्हारा येथील पत्रकार विशाल नांदोकार यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले असता याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात दुसऱ्यादा बैठकीचे आयोजन केले असता सदर बैठकीमध्ये त्यांनी उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना स्पष्ट शब्दात निर्देश देऊन आपण कुठले प्रकारचे कारण न देता सदर रस्त्याचे कामे तातडीने सुरू ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण करून कामे अखंडितपणे सुरू राहावे अशा प्रकारचे निर्देश दिले.
यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तेल्हारा ते आरसुळ रस्ता एक महिन्याच्या आत चालन्या योग्य करू अशी ग्वाही दिली तसेच सदर सर्व कामें निरंतर चालू राहावे याकरिता जिल्हाधिकारी यांनी २५ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले आहे यावेळी पि. आर. सरनाईक कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवासी अभियंता शाखा अभियंता संबंधित ठेकेदार तसेच रस्ता देखरेख समितीचे उज्वल दबळघाव, सतीश उंबरकर, विशाल नांदोकार, रामभाऊ फाटकर, गजानन गायकवाड़, एडवोकेट जयश्री मानखैर, अनंत मानखैर आदी उपस्थित होते.