अकोट(देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील अडगांव खुर्द येथील बरेच नागरीकांचे घरकुल योजनेच्या यादी मधुन नाव वगळण्यात आले आहे.सदर घरकुल योजनेच्या यादीत नावे सामाविष्ट करण्यात यावेत व घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अडगांव खुर्द येथील नागरिकांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी यांना आज दि.२४ जानेवारी रोजी निवेदन दिले आहे.सदर निवेदनाच्या प्रति पालकमंत्री,जिल्हाधिकारी, आमदार,प्रकल्प संचालक,गटविकास अधिकारी,यांना दिल्या आहेत.निवेदन देतीवेळी अमन गुलाबराव गवई, ग्रामपंचायत सदस्य अडगाव खु. प्रमोद सोनोने,तंटामुक्ती उपाध्यक्ष, प्रदिप वानखडे,गोपाल घोंगे,मंगेश महाल्ले,भगवान तेल्हारकर,मोहन हिरुळकर,मंगला रंदे,संतोश शेदुरकार,तसेच गावातिल अपात्र झालेले आदी नागरीक उपस्थित होते.