अकोला (प्रती ) पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने औरंगाबाद येथील नागरिकाचा हरवलेला मिळाला शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अमलदार अरुण उपर्वट हे वाशिम बायपास चौक येथे पॉईंट ड्युटीवर असताना बुद्धभूषण सिरसाट औरंगाबाद हे त्यांना येऊन भेटले व ते आपला नवीनच घेतलेला लॅपटॉप एका ऑटोमध्ये विसरून गेल्याचे त्यांनी सांगितले ते फक्त नाव त्यांना माहीत होते ते त्यांनी पोलिस कर्मचारी यांना सांगितले ट्राफिक अंमलदारांनी चालकाच्या नावावरून क्रमांक व चालकाचा मोबाईल क्रमांक शोध लावला संपर्क करून त्यास वाशिम बायपास चौक येथे बोलावून घेऊन त्याच्या ऑटोमध्ये प्रवासी भूषण शिरसाठ यांचा लॅपटॉप मिळवून दिला आपला हरवलेला महागडा लॅपटॉप मिळेल याची अपेक्षाच नव्हती परंतु ट्रॅफिक अंमलदार यांनी त्यांच्या बौद्धिक कौशल्य वापरून ऑटो चालकांचा अपूर्ण नावावरून चालकाचा शोध लावून बुद्धभूषण यांना त्यांचा हरवलेला लॅपटॉप परत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला व त्याने ट्रॅफिक पोलीस बद्दल कृतज्ञता व्यक्त केली अश्या जबाबदारी ने ड्युटी करत असलेल्या उपर्वट यांचा समाज क्रांती आघाडी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे, परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.