अकोला- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात देण्यात येणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२१-२२ ची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार बुधवार दि. २६ रोजी लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वरुपात रोख दहा हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्हे वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे.
यंदाचे जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार सन २०२१-२२ याप्रमाणे-
गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. विधी राकेश रावल(बॉक्सिंग)
गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)- सुदर्शन गोपिकृष्ण येनकर(बॉक्सिंग)