अकोट (देवानंद खिरकर) :- दिनांक 17 जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील खापरवाडी या छोट्याशा गावांमधील आकांक्षा जिला आई-वडील नाहीत. लहान भाऊ जेमतेम तीन वर्षाचा असून तो शंभर टक्के दिव्यांग आहे. तिचा सांभाळ तिची वयोवृद्ध आजी करीत असते आणि ती काम मजुरी करून शिक्षण करते. अशी अवघ्या सात ते आठ वर्षाची मुलगी कुमारी आकांक्षा ही वरूर जऊळका येते तीन किलोमीटर शिक्षण घेण्यासाठी पायी जात असते.आपल्या भावा जवळ पोचण्यासाठी उशीर होत असतो म्हणून तीला सायकलीची अत्यंत आवश्यकता होती.
पंचायत समिती अकोट येते दिव्यांग मुलांना सायकल साठी योजना आली असे तिला कळतात ती पंचायत समिती येथे आली.तिच्याकडे योजनेसाठी लागणारे कागदपत्रे हे अधूरे असल्यामुळे ती सायकली पासून वंचित राहणार होती.त्याच ठिकाणी आदर्श ग्रामसेवक श्री.अमेश खारोडे यांच्या ती मुलगी तिची वयोवृद्ध आजी नजरेत पडली. खारोडे यांनी तिला विचारपूस केली.तिची समस्या जाणून घेतली आणि देवरूपी या ग्रामसेवक अमेश खारोडे यांनी तिला स्वखर्चातून सायकल भेट दिली आणि तिचा आनंद या गगनात मावेनासा झाला.अत्यंत लहान वयामध्ये आकांशाचे आई वडील हे जग सोडून गेले. त्यांचा सांभाळ वयाने जेमतेम सत्तर-ऐंशीच्या जवळपास असलेली तिची वयोवृद्ध आजी ही करत आहे. खरोखरच या जगामध्ये असे अधिकारी मिळणे क्वचितच आहे. त्यातीलच एक अमेश खारोडे या आधी सुद्धा त्यांनी लोककल्याणकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचवल्या या आधी सुद्धा त्यांनी वणी वारुळा येथील भिका बाईला कोणताही आधार नसतांना तिला आधार दिला आणि तिचा महिन्या वरील खर्च ग्रामसेवक खारोडे हे करतात. गरिबांसाठी काम करताना ते कधी आपले क्षेत्र पाहत नाही. क्षेत्रा पलिकडेही जाऊन ते गोरगरीबांची सेवा करतात.
अशा अनाथ मुलांना, वयोवृद्ध म्हातार्यांना त्यांचा नेहमी मदतीचा पुढाकार असतो. यातीलच एक प्रकार खापरवाडी बु. येथे मायबाप नसलेल्या अनाथ मुलांना त्यांनी स्वखर्चातून सायकल भेट दिली. आकांक्षा ही मुलगी तीन किलोमीटर शिक्षणासाठी पायी जाणे येणे करून चिकाटीचे शिक्षण घेत आहे.यावेळी त्यांनी सायकल,किराणा कपडे आणि आर्थिक मदत असे तिच्या घरी जाऊन दिली. तिचा लहान भाऊ अनुराग हा 100 टक्के दिव्यांग आहे. अशा अनाथ मुलांना मदतीचा हात देऊन एक प्रकारची समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली.यावेळी वणी वारुळा येथील ग्रामसेवक अमेश खारोडे, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पंचायत समिती सदस्य धीरज शिरसाट,उमेश आवारे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.