तेल्हारा: वीट भट्ट्यावर आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीस फूस लावून पळवल्याप्रकरनी आज तेल्हारा पोलिसांनी परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून मुलीस ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील एक कुटुंब तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील मनात्री बु येथील विट भट्ट्यावर उदरनिर्वाह साठी वास्तव्यास होते.दिनांक २ जानेवारी रोजी आरोपी आसकले वय 22 रा वारी हनुमान याने फूस लावून पळवले होते याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.त्यावरून आरोपीविरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पीएसआय गणेश कायंदे यांनी तपास चक्रे फिरवून आरोपीचा सुगावा लावला त्यावरून आज दिनांक १७ जानेवारी रोजी पीएसआय कायंदे ,पो कॉ अमोल नंदाने, हर्ष शुक्ला यांना आरोपी व पिडीत हे परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे कळाले. त्यावरून परतवाडा ग्रामीणचे पीएसआय गुल्हणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य करीत अल्पवयीन मुलीस व आरोपींला धामणगाव गढि येथून ताब्यात घेतले.पुढील तपास पीएसआय गणेश कायंदे करीत आहेत.