अकोला, दि.14 : जिल्ह्यात 25 ग्रामपंचायतीमधील 27 रिक्त पदांच्या पोटनिवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.17), मतदानाच्या दिवशी (दि.18) व मतमोजणीच्या दिवशी (दि.18) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.