• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

असंघटीत कामगारांचे ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणीकरीता शिबीरांचे आयोजन करा; – जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
January 13, 2022
in अकोला, फिचर्ड
Reading Time: 1 min read
100 1
0
nima arora
14
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.13: शासनाव्दारे असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी सुरु करण्यात आले आहे. ही नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामागारांची ‘ई-श्रम पोर्टल’वर नोंदणी करुन घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

असंघटीत कामगारांचे ईश्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया गतिमान व्हावे याकरीता जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक अनिल चिंचोले, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी डॉ. सुनिल मानकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी एस.एन. मोपले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक कै. जा. सोळंके तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी निर्देश दिले की, प्रत्येक शासकीय विभागाने निश्चित मुदतीत शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामगारांचे नोंदणी करुन घ्या. तसेच अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत स्थानिक स्तरावर नागरी सुविधा केंद्रामार्फत विशेष शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामगारांचे नोंदणी प्रक्रियेला गतिमान करा. विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नोंदणीकरीता पात्रता: असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली कोणतीही बँक), सक्रिय मोबाईल नंबर (ओटीपीकरीता स्वत:चा अथवा कुटूंबातील अन्य व्यक्तीचा), स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

असंघटित कामगारांनी ई-श्रम पार्टलवर नोंदणी स्वत: नागरी सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्रावर किंवा eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन 14434 व टोल फ्री 18001374150 क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी कामगार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने यांनी केले.

Tags: AkolaCampCollectorNima Arora
Previous Post

आगिखेड येथे रानटी डुकरच्या हल्यात शेत मजूर जखमी

Next Post

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
MahaDBT

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

पोलिस अधिक्षक जी. श्रीधर

व्याघ्र समितीचा घेतला आढावा; समन्वय साधून वन्यप्राणी संरक्षणासाठी प्रयत्न करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.