तेल्हारा : वाळूने भरलेला ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला चारचाकीने कट मारून शासकीय गाडीचे नुकसान करून शासकीय कामात अळथडा निर्माण केल्या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी दोघांना विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केल्याची घटना आज ता 12 बुधवार पहाटेला घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की तेल्हारा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे हे तेल्हारा पोसिस स्टेशन च्या शासकीय वाहनाने दिनांक 12 जाने बुधवारी कर्तव्यावर असतांना पहाटे सुमारे पावणेपाच वाजताचे सुमारास त्यांना मौजा नर्सिपुर येथे वाळूने भरलेला टाटा 409 या कंपनीचे वाहन क्रमांक एम एच 04 सीजी 8469 हे उकळी कडून येतांना दिसले असता. त्यांनी सादर ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता एक पांढऱ्या रंगांची व्हीस्था कंपनीची चारचाकी क्रमांक एमएच 30 पी 4625 ही गाडी मधात आली व सदर गाडीने पोलिसांच्या शासकीय वाहनाला डाव्या बाजूने कट मारून गाडीचे अंदाजीत 20 हजार रूपयाचे नुकसान करून शासकीय कामात अळथडा निर्माण केला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांनी सरकारतर्फे तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली व सदरचे वाळूने भरलेला ट्रक अंदाजीत किंमत 3 लाख 16 हजार व चारचाकी वाहन किंमत अंदाजे 2 लाख असा एकूण 5 लाख 16 हजाराचा ऐवज जप्त केला व गजानन श्रीकृष्ण खोडे, मंगेश प्रकाश खेडकर दोन्ही राहणार चोहट्टा बाजार या आरोपींना अटक केली. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे हे करीत आहेत.