अकोला-: युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त युवारंभ फाऊंडेशन तर्फे आज स्वामीजींच्या व राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस हारार्पण करून संस्थेच्या लोगोचे अनावरण झाले.
आपल्या देशाची निम्मी लोकसंख्या ही युवा वर्गात गणल्या जाते आणि याच युवकांच्या सर्वांगीण विकासा करता काम करत युवांचे व्यक्तिमत्व विकास करून राष्ट्रपुर्निर्माणाच्या व्यापक उद्देशाला घेऊन येणाऱ्या काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या वर्गा पर्यंत काम करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून युवारंभ फाउंडेशन ची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आल्याचे युवारंभ फाउंडेशन तर्फे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
कोविड नियमांचे पालन करत स्थानिक महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हारार्पण करून संस्थेच्या लोगोचे अनावरण आज युवारंभ च्या पदाधिकाऱ्यामार्फत झाले येणाऱ्या काळात शहरातील विविध विषयानघेऊन जनतेच्या दृष्टीकोन समजून घेऊन प्रशासनाच्या नजरेत आणू समस्या मार्गी लावण्या करता काम सुरु करणार असल्याचे देखील प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ.अक्षय लोखंडे, ऍड. गिरीराज जोशी,राम फरांडे, हर्षल अलकरी, शुभम तायडे, श्रीकांत पाटील,हृषीकेश अंजनकर, धनंजय कुलकर्णी, ऋषिकेश देवर, विभव दीक्षित, विराज वानखडे, सोहम कुलकर्णी, अक्षय जोशी, सारंग देव,हर्षवर्धन देशपांडे आदी उपस्थित होते.