तेल्हारा: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या लेख लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात प्रा. डॉ धीरजकुमार नजान यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव ता. तेल्हारा जि. अकोला येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर आदईगांव ता.पनवेल जि. रायगड येथील से.नि.मुख्याध्यापक चंद्रकांत काशिनाथराव बावस्कर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनदर्शन स्मरणिका समितीच्या वतीने राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवनदर्शन घडवणारे दर्जेदार लेख राज्यभरातून प्राप्त झाले होते.
या लेख लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगांव ता. तेल्हारा जि. अकोला येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. धीरजकुमार नजान हे प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आदईगांव ता. पनवेल जि. रायगड येथील चंद्रकांत काशिनाथराव बावस्कर यांनी प्राप्त केले आहे. तर मालेगाव जि. वाशिम येथील अरुणकुमार कुलकर्णी यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळाले आहे. जळगाव येथील अशोक पारधे व चिखली जि. बुलढाणा येथील सत्य प्रयागबाई कुटे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व तृतीय क्रमांक ३ हजार रुपये बक्षिस ठेवण्यात आले होते. या लेखन स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धकांना लवकरच बक्षीस वितरण सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. असे आयोजन समितीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.