तेल्हारा: तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक व सदैव समाज कार्यात अग्रेसर असणारे प्रदीप सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.
मित्रपरिवार यांच्यावतीने वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले त्यानंतर रक्तगट तपासणी शिबिराला सुरुवात झाली यावेळी मित्र परिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या रक्तगट तपासणी शिबिरामध्ये तेल्हारा शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन 141 नागरिकांनी रक्तगट तपासणी केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रदीप सोनटक्के यांचे मित्र परिवार उपस्थित होते. येणाऱ्या पुढील काळात यापुढील काळात गरजवंतांना रक्तपुरवठा पुरवण्याची कुणाचा संकल्प करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, व या माध्यमातून तेल्हारा शहरामध्ये रक्तदाते तरुणांची फळी निर्माण करण्याचा संकल्प प्रदीप सोनटक्के यांनी केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात अनेक समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या मित्रपरिवारासह नागरिक उपस्थित होते.