अकोला: पद्मश्री, अनाथांची माय, थोर समाजसेविका,स्व. सिंधुताई सपकाळ (माई) यांचे पुणे येथील ग्यालक्सी रूग्णालयात हृदयविकाराने वयाच्या 73 व्यां वर्षी दुःखत निधन झाले.
वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे.
मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे.
सिंधुताई सपकाळ (माई) यांना शिवसेना सरकल मलकापूर, निर्भय बनो जनआंदोलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, ग्रामीण पत्रकार संघ, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था, विदर्भ सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, आदी स्वयंसेवी संस्था संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भावपुर्ण श्रद्धांजली व्ही एस बी कॉलनी मलकापूर येथील श्री गजानन महाराज चौक येथे अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक मंगेशदादा काळे, चित्रपट अभिनेते रमेशजी थोरात, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, शिवसेना उपशहर प्रमुख केदार भाऊ खरे, विभाग प्रमुख प्रमोद धर्माळे, विलास भाऊ शिंदे, उमेश भाऊ शर्मा, नानासाहेब सपकाळ किशनराव वावरे, दयाराम चोरे, पुडलिकराव काळे, प्रतापराव देशमुख, अमोल विलयातकर, आकाश पतींगे, प्रसाद पाटकर, विठ्ठल इंगळे, भैय्या भागडे, वरुडकर काका, ताटे काका, महेश कुलकर्णी, कुलटा भाऊ प्रशांत चिकटे. इत्यादी च्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला. श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पाडण्याकरता प्रमोद धर्माळे, विलास इंगळे, राजेश सोवया, विश्वनाथ चामातकर, गजानन पुणकर, हरिदास राऊत, नलिनी इंगळे, जया इंगळे, दिपाली घोंगडे, जानवी कुलकर्णी, श्रीमती मंदाताई खवले, अंकुश खवले, मंगल भगत, नम्रता धर्माळे, वैष्णवी धर्माळे, लीना भागडे, रूपाली अधनकर, भावेश भागडे, भावेश सामडकर, आजिनाथ सामातकर, शुभम दाभाडे, सुहास कोळसे, शुभम कांबळे, अजिंक्य सुरवाडे, शुमिता काळे, गीता जयस्वाल, आदीसह नगरातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.