अकोट (देवानंद खिरकर): ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने पत्रकार दिन शहरातील हॉटेल अतिथी येथे कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. या शानदार सोहळ्यात दिवंगत पत्रकाराच्या स्मरणार्थ उत्क्रुष्ट लिखाण करणाऱ्या जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सात पत्रकारांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या ए जे एफ सी च्या पत्रकार दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून अकोट शहरचे ठाणेदार प्रकाश अहिरे, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख,दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत,ए जे एफ सी चे अकोला जिल्हा अध्यक्ष संजय आठवले,पत्रकार निलेश पोटे, जिल्हा सचिव राहुल कुलट, जिल्हा उपाध्यक्ष सारंग कराळे,अशोकराव झामरे, सरचिटणीस चंचल पितांबरवाले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम थोर पुरुषाच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पत्रकारांच्या विधायक कार्यातील सहभागाने सामाजिक स्तर उंचावते.पत्रकारांची अधिक परीश्रमातून निर्माण होणारी बातमी समाज मनावर चांगले परिणाम घडवणारी असते असे सांगितले. ठाणेदार नितीन देशमुख यांनी पत्रकार हा चौथा स्तंभ मानल्या जातो. त्यामुळे या समाज घटकावर अधिक जबाबदारी आहे. सामाजिक स्तरावर सकारात्मक पत्रकारिता परिवर्तन घडवू शकते असे त्यांनी सांगितले.ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत विचार व्यक्त केले.जिल्हाध्यक्ष संजय आठवले यांनी संघटना व संघटनेशी असलेली बांधिलकी कायम ठेवून पत्रकाराच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी निलेश पोटे यांनी सूध्दा प्रास्ताविकात विचार व्यक्त केले.यावेळी प्रमुख अतिथी यांचे स्वागत ए जे एफ सी चे तालुका अध्यक्ष स्वप्नील सरकटे,शहर अध्यक्ष बाळासाहेब इंगळे,ता.कार्याध्यक्ष दिनेश बोचे, सचिव देवानंद खिरकर, उपाध्यक्ष धीरज बेलसरे,हर्षल कोल्हे आदींनी केले.कार्यक्रमासाठी अकोट तालुका अध्यक्ष स्वप्नील सरकटे, पातूर ता. अध्यक्ष गोपाल बदरखे, तेल्हारा ता. अध्यक्ष मनीष भुडके, बाळापूर ता. अध्यक्ष शामराव सुलताने, मोबीन शेख, गणेश उमाळे, प्रकाश कुकडे, रामकृष्ण मोहिते, गणपत सांगळे, संदीप ताडे, संजय सपकाळ, राजकुमार वानखडे, अक्षय जायले, विनोद वसू, सुनील बांगर, अमर मुंडाले, विशाल गवई, आकाश तायडे, यश पिंपळकार, दयाराम घनबाधुर, अमोल वानखडे, मतीन खान, मंगेश निंबोळकार, पूर्णजी खोडके, संजय टेलगोटे, राहुल भेले, विष्णू तेल्हारकर, शेखर तेलगोटे, मनीष बोरोडे, राजू काळे, आशिष जवंजाळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काकड तर आभार प्रदर्शन विनोद राठोड यांनी केले.
अकोट तालुक्यातील दिवंगत पत्रकार स्व. सुधीर पाठक, स्व. जगन्नाथ कोंडे, स्व.ज्ञानेश्वर घोडिले, स्व. महादेवराव लाजूर कर , स्व.हरिभाऊ देव तथा माजी पोस्ट मास्तर स्व.श्रीराम पुंडलिक इंगळे यांच्या स्मरणार्थ तसेच संघटनेच्या वतीने एक विशेष पत्रकारिता पुरस्काराने सात पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या मध्ये विनोद राठोड, सुधाकर राऊत, सागर भाल तीलक, गणेश बोरचाटे, संजय गवळी, मनीष भुडके व वर्षा मोरे यांचा समावेश आहे. तसेच अकोट शहरातील पत्रकार मुकुंद कोरडे, संतोष सावजी, प्रकाश गायकी, किरण भडंग, नितीन तेलगोटे, बाळासाहेब इंगळे,संतोष विणके, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काकड आदींचा स्म्रुती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.