तेल्हारा : तालुक्यातील चारही भागातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेले आश्वासन व जिल्हाधिकारी नीमा अरोरा व उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष दिलेल्या भेटीनंतर व पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी केलेल्या. विनंतीनंतर अखेर पत्रकार दिनी युवा पत्रकार विशाल नांदोकार यांनी ६ जानेवारीला १ जानेवारी पासून सुरू केलेले,आमरण उपोषण मागे घेतले तसेच दहिगाव व थार येथे रस्त्यासाठी सुरू असलेले साखळी उपोषण सुद्धा मागे घेण्यात आले.
तेल्हारा तालुक्यातील शहराला जोडणाऱ्या चारही भागातील रस्ते ठेकेदाराने खोदून ठेवल्यामुळे व काम सुरू न केल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले या खड्ड्यातील रस्त्यांमुळे अनेकांचा अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले. तर काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता तेल्हारा येथील युवा पत्रकार विशाल नांदोकार यांनी एक जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते व आपली मागणी रेटून धरली होती उपोषणाची पार्श्वभूमी लक्षात घेता. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशाल नांदोकार यांना रस्त्यांच्या कामा संदर्भात मि स्वता लक्ष देईल व हे काम विनाविलंब सुरू होऊन चालू राहणार याबाबत मी प्रत्यक्ष लक्ष घालेल असे सांगितले.
तसेच जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन रस्त्यांची कामे अखंडितपणे सुरू राहणार याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना सूचना केल्याचे सांगितले मुळे, तसेच पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी विशाल यांची आरोग्यासंदर्भात खालावत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशालने उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. असता विशालने पत्रकार दिनी आपले, आमरण उपोषण मागे घेतले. गेल्या सात आठ दिवसापासून दहीगाव व थार येथे सुरू असलेले साखळी उपोषण सुद्धा मागे घेण्यात आले .
विशालचा राज्यमंत्र्यांची संवाद साधणे बाबत काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव डॉ. अभय दादा पाटील महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजीवनी ताई बिहाडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फळ ज्येष्ठ पत्रकार सुरेशराव शिंगनारे डॉ. अशोक बिहाडे रस्ता देखरेख समितीचे सदस्य उज्वल दबळघाव रामभाऊ फाटकर एडवोकेट पवन शर्मा डॉ. शहजाद खान धीरज बजाज एडवोकेट जयश्री मानखैर, संगीता गावंडे आदि उपस्थित होते. विशाल ने सुरू केलेल्या उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी, विविध सामाजिक संघटना महिला मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी शेतमजूर वसर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला होता.