• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘नायलॉन’ मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:दुखापतग्रस्त पक्षांना स्वयंसेवी संस्थेकडे उपचारार्थ सोपविण्याचे आवाहन

Our Media by Our Media
January 4, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
‘नायलॉन’ मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:दुखापतग्रस्त पक्षांना स्वयंसेवी संस्थेकडे उपचारार्थ सोपविण्याचे आवाहन
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- प्लास्टिक पासून बनविलेल्या नायलॉन मांजा हा पशु पक्षी व मानवास दुखापती होण्यास कारणीभूत ठरत असल्यामुळे अकोला जिल्ह्यात नायलॉन मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. दरम्यान अशा पतंगबाजीमुळे जखमी झालेले पक्षी वा जनावरे आढळल्यास त्यांना उपचारासाठी ‘सेव्ह बर्डस’ या सेवाभावी संस्थांकडे सोपवावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात निर्गमित आदेशात म्हटले आहे की, “नायलॉन मांजा” या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍यामुळे पक्षी व मानव जिवीतांस इजा होते. तसेच पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्‍या धाग्‍यांचे तुकडे जमिनीवर पडतात व हे तुकडे लवकर विघटन होण्‍याजोगे नसल्‍याने गटारे व नदीनाल्‍यासारख्‍या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्‍सम प्राण्‍यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समविष्‍ट असलेले खाद्य सेवन केल्‍याने त्‍यांना प्राणघातक ठरतात. तसेच अशा अपघटन (Non-Biodegradble) न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्‍या धाग्‍यांच्या अति वापरामुळे विजेच्‍या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्‍यांनी लागणाऱ्या आगीमुळे विजप्रवाह खंडीत होवून विज केंद्रे बंद पडतात व त्‍यामुळे अपघात होणे, वन्‍यजिवांना धोका पोहोचणे तसेच जीवितहानी होण्‍याचा संभव असतो. तसेच या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रत्‍येक शहरात विशेष पथक स्‍थापन करण्‍याचा आदेश दिला आहे व त्‍यानुसार बंदीचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून नायलॉन मांजा बंदीविषयी व्‍यापक जनजागृती करणेबाबत निर्देश दिले आहेत.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण (संरक्षक) अधिनियम, १९८६ चे कलम ५ अन्वये आदेश जारी केले आहेत. त्यानुसार,

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्‍तूपासून बनविलेल्‍या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍याच्‍या वापरावर बंदी घालण्‍यात यावी.

२. घाऊक व्‍यापारी, किरकोळ व्‍यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्‍परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी ज्‍यायोगे संपूर्ण वर्षभरात त्याची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही.

३. पतंग उडविण्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणाऱ्या धोका, माती व पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध करण्‍यात यावा.

४. पतंग उडवितांना केलेल्‍या मांजाच्‍या वापरामुळे विजेच्‍या तारांवर घर्षण होवून आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीतहानी होणे याबाबतची जनजागृती करण्‍यात यावी.

नायलॉन मांजा बंदीच्‍या अनुषंगाने अकोला जिल्‍हयात व्‍यापक जनजागृती करणे व बंदीचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर जिल्‍हा पोलीस अधीक्षक यांचे मार्फत कार्यवाही करण्यात यावी,असेही आदेशात म्हटले आहे. त्याअनुषंगाने तयार केलेल्या विशेष पथकात मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक, वनविभाग अकोला, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, अकोला यांचा समावेश असून या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी याबाबत अंमलबजावणी करावी तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दुखापतग्रस्त पक्षांच्या उपचारासाठी ‘सेव्ह बर्डस’ संस्थेचे सहकार्य घेण्याचे आवाहन

नायलॉन मांजामुळे पतंग उडवितांना आकाशात विहरणारे पक्षी तसेच तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जायबंदी होत असतात. अशा जखमी पक्षांना ‘सेव्ह बर्डस अकोला’ या संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. त्यासाठी त्यांचा हेल्पलाईन क्रमांक ७२४९४५९६६६ असा आहे. नागरिकांनी आपल्या जवळपास जखमी दुखापत ग्रस्त पक्षांना उपचारासाठी या संस्थेच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले आहे.

Tags: AppealBanCollector'sinjuredNGOnylonordertreatmentuse and sale
Previous Post

परिवर्तन स्वाभिमानी संघटना व समाज क्रांती आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post

वाडेगाव ग्रामपंचायतच्या ग्राम सेवक यांच्यावर बदलीसाठी राजकीय दबाव,बदली करु नये अशी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

वाडेगाव ग्रामपंचायतच्या ग्राम सेवक यांच्यावर बदलीसाठी राजकीय दबाव,बदली करु नये अशी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांची मागणी

तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी

तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.